एफ-एन विभाग, सहकारी संस्था, मुंबई यांचे विषयी
एफ-एन विभाग, मुंबई यांनी https://fnward.blogspot.com/ हा ब्लॉग सुरू केला आहे. सहकार क्षेत्रातील माहिती, पारदर्शकता आणि डिजिटल परिवर्तन यांचा प्रसार करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून सहकारी संस्थांबद्दलची माहिती, धोरणे, उपक्रम आणि विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.
एफ-एन वॉर्डच्या ब्लॉगची वैशिष्ट्ये:
1. 100 दिवसांची कृती आराखडा - सहकारात नवदृष्टी आणि डिजिटल वाटचाल
एफ-एन विभागाने सहकार क्षेत्रात नवदृष्टी, पारदर्शकता आणि डिजिटल परिवर्तन घडविण्यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात विविध उपक्रमांची अंमलबजावणी, प्रशिक्षण कार्यक्रम आणि डिजिटल साधनांचा वापर यांचा समावेश आहे.
2. एफ-एन वॉर्डच्या ब्लॉग आणि QR कोड ग्रंथालय उपक्रमाविषयी
सहकार विषयक माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एफ-एन विभागाने ब्लॉग आणि QR कोड ग्रंथालय सुरू केले आहे. या माध्यमातून विविध सहकारी संस्थांच्या माहितीचा संग्रह उपलब्ध करून दिला जातो.
3. सहकारी संस्थांची यादी
लवकरच या ब्लॉगवर बिगरशेती/नागरी/पगारदार पतसंस्था, प्राथमिक कृषी पतसंस्था, सर्वसाधारण संस्था, मजूर संस्था यांची यादी उपलब्ध आहे, ज्यामुळे नागरिकांना आवश्यक माहिती सहज मिळू शकते.
एफ-एन विभागाचा हा ब्लॉग सहकार क्षेत्रातील माहितीच्या प्रसारासाठी एक प्रभावी माध्यम ठरणार आहे. या उपक्रमामुळे सहकारी संस्थांबद्दलची माहिती अधिक पारदर्शक आणि उपलब्ध होत आहे. सदर ब्लॉग सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, एफ-एन विभाग, मुंबई यांच्या संकल्पनेतून कार्यान्वित होत आहे.
No comments